पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुरंदर :प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर तहसील कचेरीतील सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती सासवडचाच रहिवाशी असुन त्याचा कोरोना अहवाल आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
सासवड येथील एका व्यक्तीच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तहसील कचेरीतील एका कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण आता १७ झालेली आहे. लोकांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर घर सोडण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन संपला आहे कोरोना नाही हे लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांनी या पुढेही काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये पडल्यास तोंडाला मास्क, दोन व्यक्तींमधे अंतर, गर्दित जाणे टाळा, कोठेही स्पर्श करु नका ही काळजी घ्यावी असे आवाहन पुरंदर तालुक्यातील प्रशासन व सोमेश्वर रिपोर्टर करीत आहे.
जाहिरात
COMMENTS