तात्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे चालु काम थांबवावे लागले : ग्रामपंचायत वाघळवाडी
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाघळवाडी येथील कन्नडवस्ती मधील नागरिकांना पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम एक वर्षापुर्वी प्राधान्यक्रमाने सुरु करण्यात आले होते. यासाठी तीन लाख निधीच्या रक्कमेतील ठेकेदारांनी दोन लाखाचे काम पुर्ण केले आहे. या कामाची तक्रार तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारदाराने केल्याने गटविकास अधिकारी यांनी सदरची जागा पाटबंधारे विभागाची असल्याने सदरच्या जागेत काम करु नये असे कळविले होते. त्यामूळे तत्काळ काम नाईलाजास्तव थांबवावे लागले. तरी यावर मार्ग काढत सोमेश्वर कारखान्या कडून पाईप लाईन करुन पाणी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती सरपंच नंदा सकुंडे आणि उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी दिली.
तसेच सदरची वस्ती पाटबंधारे विभागाच्या जागेत असल्याने येथे काम केल्यास जागेत शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात येऊ नये असे पंचायत समिती पत्र काढते. परंतू येथील नागरिक चाळीस-पन्नास वर्ष रहात आहेत. त्यांच्याकडे राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, वीज कनेक्शन अशी कागदपत्र सुधा आहेत. प्रत्येक माणसाला पिण्याचे पाणी लागते. यानुसार पिण्याच्या पाण्याची गरज पुर्ण करण्याच्या दृष्टीने सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे,सद्स्य हेमंत गायकवाड आदी सदस्यांनी ग्रामपंचायत मधून कन्नडवस्ती या वस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची तरतूद केली. त्याप्रमाणे काम सुरु केले होते. पण तक्रार झाल्याने काम थांबले आहे.
कन्नडवस्ती, लोखंडीपूल, आंबेडकर वसाहत येथील नागरिकांच्या सोई सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायत कायम प्रयत्नशील आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतू वरिल वस्त्या मधील जागा पाटबंधारे आणि गायरान जागेत असल्याने निधी खर्च केला तर तक्रार होत असल्याने तसेच पंचायत समिती कडून अतिक्रमण जागेत काम करु नये असे कळवित असल्याने या ठिकाणी विकासकाम पुर्ण करण्यास मर्यादा येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सभापती प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्या सोबत इतर रस्ते, पाणी टाकी शौचालय ही विकासकामे पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्यामूळे सर्वानी यासाठी एकत्र येऊन ही कामे पुर्ण करु असे उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी सांगितले.
COMMENTS