दिलासादायक....पुरंदर मधिल कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १५ जण निगेटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुरंदर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला मात्र त्याचा प्रसार रोखण्यात पुरंदरच्या तहसीलदारांसह प्रशासनाला यश येताना दिसुन येत आहे. दि. २६ रोजी आलेल्या पोजिटीव्ह रुग्णांपैकी एक सासवडमधील लांडगेआळीतील तर दुसरा जवळार्जुन येथिल चोरवाडीतील रुग्ण होता. यांच्या संपर्कातील सासवडचे ७ व जवळार्जुनचे ८ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आज दिली.
सासवड व जवळार्जुन मधील रुग्णाचा पोजिटीव्ह सापडल्याची बातमी समजताच जवळचे संबंध असलेल्या व्यक्तींची कोरोना तपासणी केली गेली. संबंधित परिसर कॉंटेंमेंट दोन तर इतर परिसर बफरझोनमध्ये समाविष्ट करण्यात आला. याठिकाणी कोणतीच हालचाल होणार नाही याची दक्षता घेतल्यात आली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पुरंदरच्या प्रशासनाला आज पर्यंत तरी यश आले आहे.
रुपाली सरनोबत : तहसीलदार पुरंदर
'सासवड येथील हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ७ व जवळार्जुन येथील हाय रिस्क कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मधील ८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना योग्य आहेत. पुरंदलकरांनी सुचनांचे तंतोतंत पालन केल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे.'