करंजेपुल येथे चोरी : ६७ हजारांचा माल लंपास

Pune Reporter
करंजेपुल येथे चोरी : ६७ हजारांचा माल लंपास

सोमेश्वरनगर -प्रतिनिधी  

करंजेपूल (गायकवाडमळा) येथे अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा दगडाने तोडून ६७ हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला, दि २२ रोजी हा प्रकार घडला. 
            याबाबत सोमनाथ कागल काळे वय 32 व्यवसाय मजुरी रा करंजेपुल ता बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर हकीकत अशी,  करंजेपुल गावचे हद्दीतील   राजकुमार वसंतराव गायकवाड यांचे शेतातील पोल्र्टीजवळील काळे यांचे घर आहे. 
            यांचे शेतातील पोल्र्टीजवळील काळे राहत असलेल्या खोलीचा दरवाजा दगडाने तोडुन उघडुन ४ अनोळखी इसम घरात येवुन त्यातील एकाने काळे यांना पकडुन शांत बस घरात काय असेल ते दे असे म्हणुन त्यातील दुस-या इसमाने जबरदस्तीने काळे यांच्या पत्नीस चाकुचा धाक दाखवुन तिचे गळ्यातील छोटे मोठे असलेले सोन्याचे मनिमंगळसुत्र ओढुन घेतले व दोन्ही कानातील सोन्याचे टाँप्स काढुन घेतले तिस-या व चौथ्या इसमाने माझे खोलीतील बेडचा कप्पा खोलुन चेक करुन काळे यांनी स्टीलच्या डब्यात ठेवलेली रोख रक्कम 12,000/-रु तसेच काळे यांचे मालक राजकुमार गायकवाड  यांनी त्याचा जुना दिलेला मोबाईल हँन्डसेट  असा एकुन 67,000 /- किमतीचा माल जबरस्तीने घेवुन खोलीच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावुन निघुन गेले .  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे  हे करीत आहेत.


To Top