पुरंदरच्या अतीदुर्गम पिंगोरी येथील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एका गावांमध्ये मुंबईहून आलेल्या एका महिलेचा कोरोना रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटिव आला आहे. ६२ वर्षीय ही महिला मागील दहा दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर येथून आपल्या पतीसह येथे आली होती. त्यानंतर तिला फक्त ताप आला होता. त्यामुळे तिची तपासणी करण्यात आली व आज मंगळवारी रात्री उशिरा तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
पिंगोरी येथे मुंबई-ठाणे येथून आलेल्या महिलेचा कोरोना अहवाल positive आलेला आहे. पिंगोरी गावच्या गावठाणा शेजारी असलेल्या एका वस्तीमध्ये ही महिला गेली दहा दिवस होम कोरंनटाईन होती. मात्र होम कोरोनटाईम दरम्यान या महिलेचा घरातील इतर लोकांशी संपर्क आल्याचा संशय असल्याने पुढील काळात या थेट संपर्कातील लोकांना कॉरंटाइन करण्यात येणार आहे. आज त्या महिलेचा कोरोना रिपोर्ट आला असता गावचे पोलीस पाटील, वाल्हे पोलीस, ग्रामसेवक, सरपंच हे तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी या कुटुंबातील लोकांना कॉरंटाईनड केले आहे. तर बुधवारी त्यांना जेजुरी किंवा सासवड येथील कोरोना सेंटरमध्ये पुढील तपासणी अथवा उपायोजना करण्यासाठी रवाना करणार आहेत.
या कुटुंबातील युवकांचा गावातील इतर युवकांशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे. या युवकांनी स्वत: तपासणी करून घ्यावी. मात्र पुरंदरच्या प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी यापूर्वी खबरदारी घेतली होती. त्याच पद्धतीने पिंगोरी येथील पोलीस पाटील व इतरांनी मोठे कष्ट घेतले होते. त्यांनीही या युवकांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या त्यामुळे या गावांमध्येही संसर्ग होण्याची शक्यता नाही. काल रात्री उशिरा या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत या कुटुंबाला कोरंटाईन केले आहे. सध्या पुरंदर मध्ये ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून यापैकी बहुतांश याच्या बहुतांश रुग्णांच्या संपर्कातील लोकांची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे पुरंदरची प्रशासन हे कोरोना संसर्ग वाढण्यापासून रोखण्या मध्ये यशस्वी झाले आहे फक्त लोकांनी सोशल डिस्टंसिंग मास्कचा वापर याचा वापर व अत्यावश्यक गरज असेल तरच घर सोडावे असे वारंवार सांगण्यात येत आहे.
COMMENTS