आडसाली ऊस लागवडीसाठी पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमा सुरू कराव्यात

Pune Reporter
आडसाली ऊस लागवडीसाठी पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमा सुरू कराव्यात

सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी

निरा खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती या तिन्ही कारखान्याचा आडसाली ऊस लागवड हंगाम जवळ येत असल्याने ऊसबेणे वाहतूक तसेच शेतीच्या इतर कामासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या बंद केलेल्या सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
          सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती या तिन्ही कारखान्याचा आडसाली ऊस हंगाम दि १ जुलै ते १५ जुलै च्या दरम्यान असतो, तसेच हे तिन्ही साखर कारखाने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर निरा नदी कधी असल्याने या कारखान्याचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षम हे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा तालुक्यात देखील असल्याने ऊस लागवड हंगामात दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतीची वाहने तसेच ऊस बेणे ची घेवाण देवाण होतं असते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्याने या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतीविषयक कामांची घेवाण देवाण बंद झाली आहे.
तसेच अनेक सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यात तर अनेक पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातून उसाच्या बेण्याची खरेदी करून ठेवली आहे, मात्र जिल्ह्या बंदी असल्याने उसाचे बेणे कसे आणणार या विचारात शेतकरी पडला आहे.
         त्याचबरोबर फलटण तालुक्यात पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र असून अनेक शेतकरी या ठिकानावरूनही उसाच्या बेण्याची खरेदी करत असतात, मात्र सीमा बंदी मुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला असचणी होत असल्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या निरा नदीवरील बंद केलेल्या सीमेवरील बंधारे आणि पूल काही काळासाठी खुले करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

-मुरूम चे माजी सरपंच प्रदीप कणसे यांचा थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद प्रदीप कणसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून आम्ही अनेक शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यात ऊस बेणे घेतले असून सीमा बंद असल्याने आम्ही उसाचे बेणे आणू शकत नाही, यावर फलटण चे तहसीलदार पाटील यांना भेटा त्यांच्याशी मी बोलून घेतो, असे पवार यांनी सांगितले.
To Top