पुरंदर तालुक्यातील सासवडच्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.रूग्ण संख्या ८ वर
पुरंदर : प्रतिनिधी
सासवड येथील एका व्यक्तीचा कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्याच्या जवळच्या संपर्कातील आठ व्यक्तींना करण टाईम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आज रोजी पर्यंत पुरंदर तालुक्यात एकूण 22 लोकांना कोरोना झाल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले आहे.
सकाळी तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार सासवडमधील एका व्यक्तीचा कोरोनाने काल रात्री मृत्यू झाला होता. तर आता पुन्हा सासवडमधील एका व्यक्तीचा कोरना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सासवडमध्ये थोडी चिंता वाढली आहे. सासवड येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे जवळच्या संपर्कातील ८ व्यक्ती आहेत. पुढील प्रक्रिया चालू आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 22 झालेली आहे.
COMMENTS