आठवडे बाजारात बाहेरच्या विक्रेत्यांना 'नो एन्ट्री' : वडगाव निं. ग्रामपंचायतीचा निर्णय

Admin
आठवडे बाजारात बाहेरच्या विक्रेत्यांना 'नो एन्ट्री' : ग्रामपंचायतीचा निर्णय

संतोष भोसले, प्रतिनिधी 
वडगाव निंबाळकर

वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल आठवडे बाजारात आजुबाजुच्या गावातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आणलेला माल येथील व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. कोरोनाच्या संकाटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून येथील आठवडे बाजार बंद आहे. 
            लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गेल्या रविवार पासून दि. २१ जून आठवडे बाजार भरवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला केरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फक्त गावातील रहिवाशांसाठी आठवडे बाजार राहील असे सांगण्यात आले होते.  
दि.२८ जून दुसरा रविवार नेहमीप्रमाणे आजूबाजूच्या सदोबाचीवाडी, होळ, सस्तेवाडी, चोपडज परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन आले, पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना दुकान लावण्यास परवानगी दिली नाही नाईलाजास्तव आपला माल गावातीलच व्यापाऱ्यांना देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आमचा शेतीमाल चालतो मग आम्ही बसलेले का चालत नाही असा सवाल विक्रीसाठी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी केला, याबाबत ग्राम विकास अधिकारी शहानुर शेख शेख यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ग्रामपंचायत बैठकीत मांडले जाईल, असे आश्वासन शेख यांनी दिले. सद्या तरी गावपातळीवर बाजार चालेल असे सांगण्यात आले. 

----------------
To Top