पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९३

Admin
पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९३

 पुरंदर : प्रतिनिधी
       पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या साध्या वाढली आहे. तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आज शनिवारी दुपारी पुरंदर तालुक्यातील ७ व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता तालुक्यामध्ये सासवड जेजुरीसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९३ झाली आहे.

       सासवड येथील ३९ स्वॅप पैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड येथोल ४ पैकी १ नवीन, ३ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मंदिर आहेत. ग्रामीण भागातील ३ पैकी १ नवीन सोनोरी, १ नवीन परींचे, एक हाय रिस्क कॉन्टॅक्ट सोनोरी येथील रुग्णांणा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

       आता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात दोनशे च्या जवळपास आकडा येत असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
To Top