पुरंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या १८६
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज जेजुरी येथील एका वृद्धाचा मृत्यू नंतर आता १३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८६ झाली आहे.
जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ६२ पैकी ६० स्वॅपचे अहवाल प्राप्त. ६० पैकी १३ पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व हायरिस्क कॉन्टॅक्ट आहेत. जेजुरी येथील ८, जाधववाडी येथील ३, वनपुरी येथील १, बेलसर येथील १ व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
आता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात पावशे दोनशेचा आकडा ओलांडला असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS