पुरंदर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील आता कोरोना मृत्यूची संख्या ६ झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील हाय रिस्क संपर्कातील आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वय अंदाजे ७२ वर्षे. तालुक्यातील एकूण मयत ६.
जेजुरी येथील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधिल व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आता ज्येष्ठांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात दीडशेचा आकडा ओलांडला असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ५० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आजच्या घटनेवरून ज्येष्ठ व्यक्तींनी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS