अनैतिक संबधातुन पत्नीकडुन पतीचा खुन
सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा खुन केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे नजीक असणाऱ्या चोरमलेवस्तीवर घडली. गेल्या दहा दिवसापुर्वी साप चावल्याची बतावणी करुन पत्नी व प्रियकराने अंतविधी केला. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच खुन केल्याची माहिती समोर आली.
यासंदर्भात आरोपी पत्नी रुपाली कामा मदने आणि प्रियकर दादा कामा महानवर ( रा. पाटस, ता. दौंड ) यांनी कामा बापु मदने यांची तोंड दाबुन अवघड जाग्यावर मारुन हत्या केली या कारणाने आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावन्यात आल्याची माहिती सपोनी सोमनाथ लांडे यांनी दिली.
भोंडवेवाडी गावच्या हद्दीत दत्तात्रय भोंडवे यांच्या शेतात बकरी बसण्यासाठी होती. यावेळी पत्नीच्या अनैतिक संबंधात पती कामा बापु मदने यांचा अडथळा होत होता. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत पती कामा मदने यांचे तोंड दाबुन तसेच अवघड जाग्यावर लाथा मारुन जीवे मारण्यात आले. मात्र पती कामा यास सर्प चावल्याचा बनाव करुन पत्नी व प्रियकराने अंतविधी उरकण्यास सांगुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा संशय कामाचा रामा बापु मदने यास आल्याने त्याने पोलिसांकडे फिर्याद दिली.
त्यानुसार पत्नी व प्रियकराचे मोबाईल टॅब करुन या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन कसुन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घडनास्थळी भेट देवुन पहाणी केली. या आरोपींना कलम ३०२. २०१ आणि ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनी सोमनाथ लांडे करीत आहेत.
........................................
COMMENTS