पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह @ १९५
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना आत ग्रामीण भागात ही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी रात्री उशिरा ग्रामीण भागातील २ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळत आहे. आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९५ झाली आहे.
ग्रामीण भागात परीचे व तोंडल येथे प्रत्येकी एक असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
आता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात दोनशे च्या जवळपास आकडा येत असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.