पुरंदरमधील निरा येथे आज पुन्हा ३ पॉझिटिव्ह : तालुक्यातील रुग्णांची संख्या ४६८.
पुरंदर :
पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी पाठोपाठ आता सर्वात मोठे गाव असलेल्या निरा शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत चालली आहे. बुधवारी १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज सोमवार दि. २७ रोजी पुन्हा ३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता निरेमध्ये ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यात आता ४६८ झाली आहे, तर मृत्यु २० झाले आहेत
नीरा येथील ३ व्यक्तींचे खाजगी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे. आत्ता आलेले हे तीन पॉझिटिव्ह अहवाल हे पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील नसून. हे तीनही रुग्ण वेगळ्या कुटुंबातील आहेत.
COMMENTS