पुरंदरमध्ये कोरोनाचा १० वा बळी
पुरंदर :प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाचा आज बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मृत्यूची संख्या १० झाली आहे.
काल सासवड येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. सदर रुग्ण पुणे येथे उपचारासाठी दाखल होते. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २५८ व कोरोना मृत्यूची संख्या १० झाली आहे.
COMMENTS