पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

Pune Reporter
पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

पुरंदर :प्रतिनिधी 

पुरंदर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट होत असलेल्या सासवड सह ग्रामीण भागातील रुग्ण संख्या आज रोजी अकरा वाजेपर्यंत एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. सासवड शहरातील ७ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४ रुग्ण आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ११२ वर गेली आहे.

       पुरंदर तालुक्यातील एकूण ४१ सॅम्पल पैकी १२ पॉझिटिव्ह आले आहेत, १२ पैकी १ व्यक्ती भोर तालुक्यातील आहे तर इतर पुरंदर तालुका ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ११ पैकी ४ ग्रामीण भागातील तर ७ पॉझिटिव्ह रुग्ण सासवड शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधील आहेत. ३ हायरिस्क  कॉन्टॅक्ट आहेत, ८ रुग्ण नवीन व्यक्ती आहेत अशी माहिती तहसीलदार सरनोबत यांनी दिली आहे.

    पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये सकाळी आलेल्या अहवालात एकही रुग्ण आला नव्हता. मात्र सकाळी दहा नंतर शहरातील ७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत; तर ग्रामीण भागातील बेलसर, दिवे, वनपुरी व सुपे येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
         त्यामुळे आता सासवड सह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पुरंदरचे प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर लोक कामधंदा निमित्त घराबाहेर पडत आहेत. हे करत असताना सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती धोकेदायक होऊ शकते. तरी सर्व नागरिकांनी अनलॉक २ मध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. 
To Top