सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सासवड शहरातील मद्यालये स्वयंस्फूर्तीने बंद : सासवडच्या सजग नागरिकांनी केली होती मागणी

सासवड शहरातील मद्यालये स्वयंस्फूर्तीने बंद :
सासवडच्या सजग नागरिकांनी केली होती मागणी

पुरंदर : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, विरोधी पक्षनेते, व मुख्याधिकारी यांनी आठवड्याभरासाठी सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी वाईन शॉप व दारूची दुकाने उघडी दिसल्याने काही सजग नागरिकांनी याविषयी सोशल मीडियाच्य मध्यमातून आपली मते मांडत आवाज उठवला व सासवडच्या सुरक्षेच्यादृष्टीने काही वेगळ्या उपयोजना सुचवल्या त्याचा परिणाम आज जाणवू लागला आहे. सासवड शहरातील वाईन शॉप व दारूची दुकाने त्यांच्या मालकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले आहेत.
              सासवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊन नंतर लोकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहेत. यासाठी नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना मार्फत स्वयंसेवकांना तशा सूचना दिल्या आहेत. स्वयंसेवकांन तर्फे लोकांना लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी जसे भाजीपाला, किराणा, दूध, औषधे व इतर साहित्य घरपोच दिले जाणार आहे. त्यासाठी काही स्वयंसेवक मागील काळात नेमले होते मात्र यातील काही समाजसेवकांनी त्या पासचा दुरुपयोग केला होता. ते फक्त गावात भटकण्यासाठी या पासचा उपयोग करत होते असेही निदर्शनास आले होते. त्यामुळे आता ज्या स्वंयसेवकांची नेमणूक केली आहे, ज्याला पास दिला आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने काम करणे गरजेचे आहे. तसे करायचे नसेल तर पास पुन्हा मुख्याधिकारी किंवा नगरपरिषदेत जमा करावा व त्या ठिकाणी दुसरे स्वयंसेवक नेमले जातील. सासवडकरांनी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तरी कृपया तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडा, घरामधून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडा. शक्यतो घरात राहूनच थोडे दिवस नगरपरिषदेला सहकार्य करावे. घरी बसल्यावर काही अडचण असल्यास तसे नगर परिषद प्रशासनाला कळवावे उदाहरणार्थ पाणी येत नसेल, केबल नेटवर्क नसेल, वीज नसेल, मोबाईल नेटवर्क नसेल तर तसे प्रशासनाला कळवावे या गोष्टींचा तातडीने पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल. तरी लोकांनी घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे व सासवड शहर लवकरच कोरोनामुक्त करण्यासाठी हातभार लावावा.

नागरिकांनी मानले सोमेश्वर रिपोर्टर चे आभार

सासवड शहरातील काही सजग नागरिकांचे नेतृत्व करणारे डॉ. उदयकुमार जगताप यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून सासवड शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपाय योजनेसंदर्भात काही सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने सासवड शहरातील सर्व दुकाने व अस्थापने बंद ठेवण्यात येत असतील तर मद्यालय का चालू ठेवायची, याठिकाणी गर्दी होत नाही का? याठिकाणी सोशल डिस्टंसींग पाळले जाते का? असे सवाल उठवले होते. ही अत्यावश्यक गोष्ट आहे का? त्यामुळे या विषयाची सोमेश्वर रिपोर्टरने दखल घेत वार्तांकन केले व संपूर्ण पुरंदर तालुक्यात या बातमीची दखल घेतली गेली

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सासवड शहरातील मद्यालये स्वयंस्फूर्तीने बंद : सासवडच्या सजग नागरिकांनी केली होती मागणी
सासवड शहरातील मद्यालये स्वयंस्फूर्तीने बंद : सासवडच्या सजग नागरिकांनी केली होती मागणी
https://lh3.googleusercontent.com/-hLlO5LNhhaM/XwGVtmyBBgI/AAAAAAAAC6I/gOwGbFEf6O8vTJuVlRooUWzNZzC_NbjTQCLcBGAsYHQ/s1600/1593939362429084-0.png
https://lh3.googleusercontent.com/-hLlO5LNhhaM/XwGVtmyBBgI/AAAAAAAAC6I/gOwGbFEf6O8vTJuVlRooUWzNZzC_NbjTQCLcBGAsYHQ/s72-c/1593939362429084-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_5.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_5.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy