पुरंदरच्या ग्रामीण भागामध्ये कोणाची रुग्ण आढळून आले आहेत
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात आता कोणाची रुग्ण हळूहळू वाढत आहेत आज रविवारी पाच जुलै रोजी सकाळी पुरंदरच्या ग्रामीण भागातील २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केली आहे.
रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पुरंदर मध्ये १०३ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पुरंदर तालुक्यातील एकूण १५ सॅम्पल पैकी २ व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एक बेलसर येथील नवीन रुग्ण तर एक वनपुरी येथील पूर्वीच्या सुपे येथील रुग्णाचा हायरिस्क कॉन्टॅक्ट मधिल आहे.
मागील दोन दिवसांपासून सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन केले असल्याने त्याचा परिणाम पुढील काळात दिसून येत आहे. मागील आठवड्यात सासवडच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकी होती. मात्र आता आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामीण भागात हळूहळू कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पुरंदर करांनी अजूनही सावधगिरी बाळगत सोशल डिस्टंसिंग, मास्कचा सतत वापर, सॉनिटायझरचा वापर व विनाकारण घराबाहेर पडू नये असे अहवाल तालुका प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व पाचशे ते हजार रुपये दंड वसूल करावा असे सक्ती करण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अशी कारवाई करण्यास धजावत नाहीत. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांनी अशी कारवाई करावी असा त्यांचा रोख आहे. मात्र लोकप्रतिनिधी या मास्कच्या कारवाईबाबत कोठेही पुढाकार घेताना दिसत नाही. फक्त लोकहीत जपण्यात त्यांचे स्वारस्य दिसून येत आहे. तरी लोकांनी दंड भरण्या पेक्षा घरा बाहेर पडताना मस्कचा वापर जरूर करावा असे आव्हान सोमेश्वर रिपोर्टर करीत आहे.
COMMENTS