दिलासादायक......मुरूम च्या पेशेंट च्या संपर्कातील चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी कोरोना पेशेंट च्या संपर्कातील चौघांचे ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
मुरूम येथील एका व्यक्तीच्या दि २ रोजी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील चौघांची काल बारामती या ठिकाणी तपासणी केली, यामध्ये त्या चौघांचे ही अहवाल निगेटीव्ह आल्याने मुरूम आणि वाणेवाडीकरांनी सुटकेचा निःस्वास सोडला आहे.
मुरूम च्या पेशेंट ची चाचणी पॉझिटिव्ह आल्या नंतर मुरूम आणि वाणेवाडी ही गावे पुढील १४ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आलेली आहेत
COMMENTS