नीरा शहरात विना मास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई : ५००० रुपयांचा दंड वसूल
पुरंदर : प्रतिनिधी
नीरा येथील मागील बुधवारी आठवडे बाजारात गांधीगिरी करत बाजरकरुंना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अक्षरशः हात जोडून पाया पडून विनंती करण्यात आली तरी आज शनिवारी लोक बाजारपेठेत विना मास्क फिरत असल्याने नीरा ग्रामपंचायत व पोलीसांनी धडक कारवाई करत पाचशे रुपये दंड वसुल केला. संध्याकाळी फक्त एक ते दिड तासात दहा विना मास्क लोकंनवर कारवाई करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीने दंडरुपी ५००० रुपये जमा केले.
मागील आठवडे बाजारात ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, पत्रकार , पोलीस व ज्युबिलंट फाउंडेशनने बाजारकरूंना मोफत भासू वाटले. त्याच वेळी लोकांना विनंती करत सांगण्यात आले की पुढील काळात नीरा शहरात विना मास्क दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
लोकांना कोरोना विषयी सांगीतले तरे चेष्ठेचा विषय केला जात आहे. मास्क लावायला सांगितले तरी लोक मास्क लावत नाहीत. महाराष्ट्र शासनाने व पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या सुचनेनुसार ही कारवाई केली जात असल्याचे नीरा पोलीसांकडून सांगण्यात आले. नीरा शहरातील शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौक या दरम्यान विना मास्क फिरणा-या लोकांना पाचशे रुपये दंडाची पावती करण्यात आली. यावेळी सुमारे दहा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत सुमारे ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन ठोंबरे यांनी सांगितले.
COMMENTS