शरीर संबंधास नकार देणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण, पती विरुद्ध गुन्हा दाखल : सस्तेवाडी येथील प्रकार

Admin
शरीर संबंधास नकार देणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण, पती विरुद्ध गुन्हा दाखल : सस्तेवाडी येथील प्रकार

सोमेश्वरनगर  :  प्रतिनिधी

सस्तेवाडी ता बारामती येथील पत्नीने शरीर संबंधास नकार दिला म्हणून चिडून जाऊन नवऱ्याने तिला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकावर वडगाव निंबाळकर पोलिसांत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                                   याबाबत आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून  सदर  महिलेचा पती दत्तात्रय बाबुराव ढोणे रा सस्तेवाडी ता बारामती याच्या विरोधात भा द वि कलम ३०७, ३२६, ५०४ आणि ५०६ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि १८ रोजी फिर्यादी पत्नी यांनी आपल्यात देवीच्या आरतीचा कार्यक्रम चालु आहे. तसेच माझा मणका खुप दुखतो असे म्हणुन शरीर संबंध करण्यास नकार दिला त्यावेळी आरोपी याने चिडुन जावुन फिर्यादीस शिवीगाळ करुन तुला मारुन कॅनॉलमध्ये टाकतो असे म्हणुन दरवाज्याला आतील बाजुने लावलेला दगड हातात घेवुन फिर्यादीचे  डोक्यात दोन ठिकाणी तिन चार वेळा मारला त्यानंतर फिर्यादीच्या डोक्यातुन रक्त येवु लागल्याने तिने ओरडण्यास सुरवात केली. आरोपी पती याने  एका हाताने तोंड दाबुन दुस-या हाताने गळा दाबला त्यावेळी फिर्यादीने  आरोपी पती याचा हात सोडविला असता आरोपी पती यांने  गळ्यावर पाय दिला. त्यावेळी पत्नी पायखोडु लागले तेवढ्यात घराचे बाहेरुन कोणाचा तरी आवाज आल्याने आरोपी पतीने  फिर्यादीचे गळ्यावरुन पाय काढला. 
            पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पोलीस नाईक नितिन बोराडे करत आहेत.
To Top