लालपरी झाली आता मालवाहतूक ट्रक : लॉकडाऊन मध्ये राज्यात धावतात एसटी महामंडळाचे ६०० मालट्रक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात प्रवाशी वाहतूक बंद झाल्यानंतर आता राज्यातील परिवहन महामंडळाने माल वाहतुक ट्रकवर भर दिला आहे. सद्या एसटी महामंडळाचे ६०० मालवाहतूक ट्रक राज्यात धावत आहेत.
लॉकडाऊन मध्ये राज्यातील जवळपास सर्वच आगारातील बसेस ची प्रवाशी वाहतूक बंद पडल्याने परिवहन महामंडळाने यावर तोडगा काढत बसचेच माल वाहतूक ट्रक करण्यात आले असून राज्यात सद्या ६०० पेक्षा जास्त मालट्रक रस्त्यावर धावत आहेत. लॉकडाउन जरी उठला तरी प्रवाशी वाहतुकीबरोबर मालवाहतूक अशाच प्रकारे चालू राहणार आहे. येणाऱ्या काळात तीन हजारापर्यंत माल वाहतूक ट्रक करण्याचा परिवहन महामंडळाचा मानस आहे. यामध्ये ट्रक ज्या प्रमाणे मालाची वाहतूक करत आहेत. अशाच प्रकारे परिवहन महामंडळाचे माल ट्रक वाहतूक करणार आहेत. यासाठी महामंडळाने बसेस ची आतील सीट काढून पाठीमागील बाजूने दरवाज्या करण्यात आला आहे. यामध्ये १० टन वजनापर्यंत मालाची वाहतूक केली जात आहे. यासाठी ३३ ते ३५ रुपये किलोमीटर पर्यंत भाडे ठेवण्यात आले आहे.
रमाकांत गायकवाड- आगर प्रमुख सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २३७ ट्रक सोलापूर विभागातून बाहेर पाठवण्यात आले आहेत. महामंडळ ने घेतलेल्या निर्णयाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून भविष्यात प्रवाशी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक ट्रक ही धावणार आहेत.