निंबुत- फरांदेनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत- फरांदेनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
फरांदे नगर निंबुत येथील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे असे असे एकूण आज चार पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत उर्वरित अहवाल प्रतीक्षेत आहेत.
काल घेण्यात आलेल्या एकूण 69 स्वॅब नमुन्यांपैकी 44 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे
COMMENTS