पुरंदरमध्ये कोरोनाचे गुरवार पर्यंत २९७ रुग्ण, एकुण बळी १२. तर २४ तासात ४ बळी

Admin
पुरंदरमध्ये कोरोनाचे गुरवार पर्यंत २९७ रुग्ण, एकुण बळी १२. तर २४ तासात ४ बळी 

पुरंदर  :  प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने आढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अल्पावधीतच पुरंदरच्या कोरोना रुग्णांचा आकडा त्रीशतकीच्या वाटेकडे तर सासवड पावणेदोनशेच्या वाटेवर पोहचला आहे. काल गुरुवारी १६ रोजा पुरंदर तालुक्यात २४ तासात तब्बल ४ कोरोना मृत्यु सोमोर आले.

        सासवड येथील १ महिला व १ व्यापारी, जेजुरी येथील १ मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला व सोनोरी येथील मृतांचा ही रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला. म्हणजे काल गुरुवारी २४ तासात ४ बळी गेले आहेत. आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९७  तर मृत्यू १२ झाले आहेत.
        काल गुरुवार १६ जुलै रोजी पर्यंत पुरंदर तालुक्यात कोरोनाचे एकुण २९७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहेत, तालुक्यात कोरोनामुळे एकुण १२ जणांचा मृत्यू झाला आहे, एकुण १२५ रुग्ण उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहेत, तर १६० रुग्णांनावर आजही कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

     लॉकडाऊन सुरू असताना पुरंदर तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता, मात्र लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने अनलॉक वन - टू (बिगिनिंग अगेन) हे अवलंबले. त्यानंतर शहरी भागातील मूळचे पुरंदरकर गावाकडे येऊ लागले, तसेच पुरंदर तालुक्यातील चाकरमानी पुणे व इतर शहराकडे कामानिमित्त जाऊ लागले. निष्काळजीपणा मुळे त्यांना कोरोनाची लागण होऊ लागली. अगदी औषध निर्माण करणाऱ्या कंपनीतली कामगारही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सासवड जेजुरी सह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरू झाला. काल गुरुवार दि.१६ रोजी कोरोनाचे २९६ रुग्ण झाले आहेत. पैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १२५ जणांवर उपचार करण्यात आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आजही १६० रुग्ण सासवड जेजुरी व पुणे येथील विविध कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

      पुरंदर तालुक्यातील गाव निहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे सासवड १७५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ मृत, उपचारांती ९२ घरी सोडले तर ७९ रुग्ण उपचार घेत आहेत. जेजुरी येथील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, पैकी २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १ रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर १६ रुग्ण आज रोजी उपचार घेत आहेत. सोनोरी येथील २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, १ रुग्ण मृत झाला आहे. ४ रुग्णांना उपचाराअंती सोडले आहे तर आज रोजी १८ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरोळी येथील ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. पैकी १ रुग्ण मृत्यू झाला आहे, ५ रुग्ण उपचार घेतल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. केतकावळे येथील ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. ४ रुग्णांवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर १ रुग्ण उपचार घेत आहे. वाघापूर येथील ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ५ रुग्णंवर उपचार सुरू आहेत. गराडे येथे ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते सर्वांनर उपचार सुरू आहेत.

        भिवडी येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, १ रुग्ण मृत झाला आहे तर ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कुंभारवळण येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ३ रुग्णांवर उपचाराअंती सोडले आहेत तर १ रुग्ण उपचार घेत आहेत. जाधववाडी येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, ४ ही उपचार घेत आहेत.  उदाचीवाडी येथील ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, चवघांवर उपचार सुरू आहेत.  कोडीत येथील ४ पॉझिटिव्ह आले आहेत १ रुग्णावर उपचारा नंतर घरी सोडले तर ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिवरे ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत चौघांवर उपचार सुरू आहेत. सुपे खुर्द येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे, २ रुग्णांवर उपचार केलेल्या नंतर घरी सोडण्यात आले आहे. बेलसर येथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

        मांढर येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १ रुग्ण उपचार आंती घरी सोडण्यात आले आहे. पिंगोरी येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन्ही रुग्णांवर उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. परिंचे तेथील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वनपुरी व तोंडली येथील प्रत्येकी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धनकवडी येथील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सटलवाडी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत दोघांवर उपचार सुरू आहेत. वीर, नाझरे, जवळार्जुन, बोपगाव, माहूर, खळद, वाल्हे, खानवडी, दौंडज येथील प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पारगांव, भिवरी, माळशिरस, पिसर्वे, आंबोडी येथील प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. पुरंदर तालुक्यात एकूण २९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. १२ रुग्णांचा मृत्यू झाले होते. १२५ रुग्णांवर उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. तर १६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी गुरुवारी संध्याकाळी दिली आहे.
To Top