सोमेश्वर'कडून ऊसतोडणी आणि वाहतुकदारांचे १० कोटी ६७ लाख खात्यावर जमा

Admin
'सोमेश्वर'कडून ऊसतोडणी आणि वाहतुकदारांचे १० कोटी ६७ लाख खात्यावर जमा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम  २०१९-२०२० मध्ये
गाळप झालेल्या ९ लाख ३४ हजार मे.टन ऊसाचे  प्रतिटन १०० रुपयाने अदा केल्यानंतर काल तोडणी वाहतूक दराचे कमिशन आणि डिपॉझीटची रक्कम रुपये
१० कोटी ६७ लाख संबंधीत तोडणी वाहतूकदारांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली
         येणाऱ्या सन २०२०- २०२१  या गळीत हंगामाला तोडणी - वाहतूक यंत्रणेचे करार १ जुलै २०२० पासून चालू करणार आहोत अशी माहिती  उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी दिली यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व मुख्य शेतकी अधिकारी बापुराव गायकवाड उपस्थित होते.
To Top