सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी

जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा  उभारण्याची मागणी 

पुरंदर  :   प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया पुरंदरच्या मातीत रोवला गेला, तसेच शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्रांची भेट सुद्धा काही वर्षानंतर जेजुरी नगरीमध्ये झाली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जेजुरी नगरी असल्या कारणाने जेजुरीत पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभारावा हि जेजुरीकरांची रास्त मागणी होत आहे. 
       पुरंदर तालुक्यातील सासवड मधील भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या धर्तीवर जेजुरीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचे आश्वासन देत जेजुरी नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी गट सत्तेत आला. मात्र सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या बाबत मात्र कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत नाही.  या बाबत जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनावणे यांना विचारणा केली असता, आम्ही जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचा शब्द दिला होता. आम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द पूर्ण करून शिवप्रेमींच्या उर अभिमानाने भरून येईल असा महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारू अशी माहिती दिली. तर जेजुरी नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधार्यांनी गेल्या ४ वर्षात महाराजांचा पुतळा का उभारला नाही? असा सवाल करत जेजुरीत कुठे आडबाजूला नाही तर महामार्गावरच महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जाणे लागेल असा इशारा दिला. 
     छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा अशी मागणी आता जेजुरीतील विरोधी पक्ष सुद्धा करत आहेत. मात्र अगोदर अनेक वर्ष सत्तेत असताना त्यांनी सुद्धा याबाबत का पुढाकार घेतला नाही हे सुद्धा कोडेच आहे. जेजुरीत विविध सामाजिक संघटना, शिवप्रेमींची वाढलेली ताकद पाहता येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्या बाबत राजकारण झालं तर येणाऱ्या निवडणुकीत जेजुरीतील शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशिवाय वेगळं चित्र निर्माण झालं तर नवल वाटायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा जेजुरीत सत्ताधारी, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनीच एकत्र येऊन मतभेद विसरून एकदिलाने लवकरात लवकर उभारावा हीच अपेक्षा सामान्य जेजुरीकर नागरीक व्यक्त करत आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7035,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी
जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी
https://lh3.googleusercontent.com/-CQGitnxWbLc/Xvy8uFWcpRI/AAAAAAAAC18/_9YiHoelYy84UJEbTOMri9GVoj51wqIzwCLcBGAsYHQ/s1600/1593621652122209-0.png
https://lh3.googleusercontent.com/-CQGitnxWbLc/Xvy8uFWcpRI/AAAAAAAAC18/_9YiHoelYy84UJEbTOMri9GVoj51wqIzwCLcBGAsYHQ/s72-c/1593621652122209-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_36.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_36.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy