निरा आठवडे बाजारात गांधीगिरी करत मास्कचे वाटप
विना मास्क बाजारकरूंना हात जोडून विनंती करत मास्क वापरण्याची विनंती.
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह खेडेगावात कोरोना संसरर्गाच्या भितीने तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. लोकांच्या नाका-तोंडावर मास्क नसल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मागील आठवड्याभरात राज्यात लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला. आज नीरा (ता.पुरंदर) येथील आठवडे बाजारात बाजारकरूंना व व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती करत मास्क वापरण्याची विनंती करण्यात आली. मास्क न वापरणा-यांना गांधीगिरी करत मोफत मास्क वाटप करण्यात आले.
ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन, नीरा ग्रामपंचायत, पोलीस कर्मचारी, प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व स्थानिक पत्रकार यांच्या माध्यमातून आठवडे बाजारात धडक मोहीम राबविण्यात आली. आठवडे बाजारात लोक बिनधास्तपणे विना मस्क येत असल्याचे मागील आठवड्यात जाणवल्याने, आज बुधवारी १ जुलै रोजी सकाळी बाजार सुरू होती वेळीच गांधीगिरी करत हात जोडून विना मास्क येणाऱ्या लोकांना मास्क देऊन, पुढील काळात मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागेल त्यासाठी नेहमी मास्क वापरला जावा असे आवाहन केले.
यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, नीरेचे उपसरपंच विजय शिंदे, माजी उपसरपंच दीपक काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन ठोंबरे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, भाऊसाहेब चव्हाण, पोलीस कर्मचारी राजेंद्र भापकर, सुदर्शन होळकर, निलेश जाधव, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, ज्युबिलंटचे जनसंपर्क अधिकारी ईसाक मुजावर, ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनचे अजय ढगे, कोतवाल अप्पा लकडे, पत्रकार भरत निगडे, राहुल शिंदे, रामदास राऊत आदी उपस्थित होते या सर्वांनी बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच बाजारात फिरून लोकांना मास्क वापरणे विषयी माहिती सांगत पुढील बाजारा वेळी मास्क घालून यावे तसे न केल्यास ग्रामपंचायत प्रशासन दंड करणार असल्याचे सांगितले.
मनोझ डेरे :- ग्रामविकास अधिकारी नीरा.
'कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लोकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. आजच्या आठवडे बाजारात गांधीगिरीच्या माध्यमातून बाजारकरुंना मोफत मास्क दिले आहेत. मात्र पुढील आठवड्यात जर विना मास्क आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २०० रुपये दंड भरावा लागणार आहे.'
COMMENTS