निरेत अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
पुरंदर : प्रतिनिधी
निरा येथील एका युवकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलगी व तिच्या पालकांनी निराश पोलीस दुरक्षेत्रात तक्रार देऊन जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशन दिली आहे. संबंधित युवक युवकाला अजूनही अटक झाली नाही.
निरा शहरात मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण मागील काळात घटले होते. निरा - जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दामिनी पथक व मुलींसाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून मुलींमध्ये जागृती केली होती. त्यामुळे मागील दोन वर्षापासून छेडछाडीचे प्रमाण घटले होते.
मात्र काल नीरा येथे गुन्हा दाखल झाला निरा येथील शाळकरी मुली शाळेत जाते वेळी हा युवक तिची छेडछाड करत असे, अगदी हात धरे पर्यंत यांची मजल गेली. शाळा किंवा क्लासला जाताना मुली एकटे जात असतात. अशावेळी गल्लीबोळ मध्ये या युवकाने छेडछाड केल्याने ती मुलगी घाबरून गेली. यापूर्वीही या मुलाने त्या मुलींना वेळोवेळी असा त्रास दिल्याने आज तिने पालकांना याविषयी कल्पना देऊन, पालकांनी निरा दुरक्षेत्रात तक्रार दिली असून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या छेडछाड बद्दल बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवक हा नीरा प्रभाग चार मधील असून आकाश राजेंद्र झुंजूरके (वय.१९) असे नाव आहे. हा युवक कालपासून नीरा येथे दिसून येत नसल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. तरी नीरा पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र भापकर व सुदर्शन होळकर आरोपी युवकाचा शोध घेत आहेत.
COMMENTS