पुरंदर तालुक्यात आज नव्याने किती कोरोना पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर
पुरंदर :प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील १५ व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. पुरंदर तालुक्यात आज रोजी ८७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.
आज तालुक्यात एकूण १५ कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. २ नवीन रुग्ण कुंभारवळण येथील आहे. १३ रुग्ण सासवड शहरातील आहेत. त्यापैकी ४ रुग्ण नवीन आहेत. ९ रुग्ण पूर्वीच्या रुग्णांचे हाय रिस्क कॉंटेक्ट आहेत.
एकूण रुग्ण ८७ झाले आहेत.
COMMENTS