पुरंदर पंचायत समितीमध्ये कोरोनाचा थेट शिरकाव
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या नगर परिषदेच्या हद्दीतील रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही. तोच आज चक्क पुरंदर पंचायत समिती मध्येच पूर्ण रुग्ण आढळून आले आहेत. पुरंदर पंचायत समितीच्या विद्यमान महिला सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याने पुरंदर सह सासवड शहराला मोठा धक्का बसला आहे.
इतके दिवस पुरंदर मधील सर्वसामान्य लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होते, तर मागील आठवड्यात सासवड नगरपालिकेचे सदस्य पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आता पुरंदर पंचायत समितीमध्ये कोरोनाने थेट शिरकाव केला आहे. पुरंदर पंचायत समितीच्या विद्यमान महिला सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता सासवडसह तालुक्यातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. चक्क पुरंदर पंचायत समितीचे सदस्य पॉझिटिव्ह आल्याने पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांची धांदल उडाली आहे. पुरंदर पंचायत समितीमध्ये कोरोनाने थेट शिरकाव केल्याने आता किती लोक यामध्ये बाधित होतील याविषयी शंका-कुशंका वाढू लागले आहेत. पंचायत समितीच्या महिला सदस्य सध्या सासवड येथील सोपाननगर भागातील नामदेव विद्यालया शेजारी राहत आहेत. त्यांच्या परिसरामध्ये ही लोकांनी सध्या काळजी घेणे गरजेचे आहे.
COMMENTS