लोणी भापकर येथे एक कोरोना पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील एका पोलीसाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
सदरील व्यक्ती ही लोणावळा या ठिकाणी पोलीस असून त्याचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दि २६ रोजी हा व्यक्ती लोणी भापकर या ठिकाणी आला होता, त्याला सर्दीचा तास होऊ लागल्याने काल दि १ रोजी त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले
बारामतीच्या २२ वर्षीय तरुणांच्या मोठ्या भावलाही किरोनाची लागण
कालच्या बारामती येथील एका २२ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा २९ वर्षीय मोठा भाऊ याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
COMMENTS