सासवड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी निगेटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
मागील आठवड्यापासून सासवडमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच एक नगरसेवक व एका नगरसेवकाची पतीचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यावेळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष व इतरांची कोरोना स्वॅप टेस्ट घेण्यात आली. त्यातील काहींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाला आहेत. यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आल्याची बातमी नाही.
सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडवे, मुख्याधिकारी विनोद जळक, मोहन चव्हाण यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेने निश्वास सोडला आहे. सासवड नगरपालिकेची नगरसेवक पॉझिटिव्ह आल्याने नगरसेवकांसह, पदाधिकाऱ्यांचे व इतरांच्याही कोरोना तपासणी तातडीने करण्यात आली होती. ज्ञानेश्वर कामथे, अनिल जगताप, सुजाता खाडे, संदेश मांगडे. यांच्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
COMMENTS