पुरंदर तालुक्यातील आजची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या किती वाचा सविस्तर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड व परिसरातील खेडेगावातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. आज दि.१ जुलै रोजी संध्याकाळी पुन्हा एक रुग्णाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुपे येथील व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सुपे येथील एका रुग्णाचा अहवाल positive आलेला आहे. काल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ होती. आज सकाळी सासवड येथे ३ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने व आता १ रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता एकूण ७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. एकूण रुग्ण - ७२, कोरोनाने मयत -३, उपचार घेऊन घरी आलेले - २१, दवाखान्यात उपचार घेत असलेले -४८ रुग्ण आहेत.
सासवड मधील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांमध्ये तेल, साबण, डिर्जंट पावडर व इतर अनावश्यक वस्तू विक्रीस ठेवल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसाच्या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक वस्तू असलेल्या काही दुकानांमध्ये नको त्या वस्तूही दिसून आले आहेत. यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे की कोरोनाची वाढती रुग्ण संख्या कशी कमी करायची. शासनाकडून संपूर्ण लॉकडाउन ठेवण्याचे निर्देश नाहीत, त्यामुळे अंशतः किंवा कंटेनमेंट झोन यापुरताच ठेवता येतो. प्रशासनाकडून लोकांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, सॉनिटायझरचा मुबलक वापर आदी खबरदारी घेण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे. मात्र लोक गर्दी करत आहेत. तरीही अजूनही वेळ गेलेली नाही कृपया लोकांनी सतर्कता बाळगत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, लवकरच सासवड शहर करोना मुक्त होण्यास मदत होईल असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
COMMENTS