सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबालालजी काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्यख्यानमाला : मात्र.....

Admin
सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबालालजी काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्यख्यानमाला :  मात्र.....

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबालालजी काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली नसून कोरोना महामारीच्या संकटामुळे व्याख्यानमालेत खंड पडू नये म्हणून महाविद्यालयातील  अवघ्या १० ते १२ प्राध्यापकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टसिंग चे पालन करत ही व्याख्यानमाला पार पडणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांनी दिली. 
          सदरची व्याख्यानमाला ही दि ३१ जुलै, १ आणि २ ऑगस्ट रोजी काकडे महाविद्यालयात पार  पडेल. यासाठी बाहेरील कोणताही वक्ता बोलावला जाणार नसून महाविद्यालयातील प्राध्यापकच व्याख्याते असणार आहेत. दि २ ऑगस्ट रोजी बाबलालजी काकडे यांच्या पुतळ्यास महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
To Top