सासवड मध्ये आज पुन्हा चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह : पुरंदरची रुग्ण संख्या ४८२ वर
पुरंदर : प्रतिनीधी
पुरंदर तालुक्यातील सासवडसह ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २ तर दुपारी आलेल्या अहवालानुसार ७ कोरोना पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदर प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात कोरणा रुग्णांची संख्या ४८२ झाली आहे.
सासवड येथून पाठविण्यात आकेल्या ३३ व जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ३७ अशा एकूण ७० स्वॅप पैकी ७ पॉझिटीव्ह आले आहेत. उदाचीवाडी १, गुऱ्होळी १, गराडे १, सासवड ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता पुरंदर तालुक्यात ४८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
COMMENTS