मांडकीत कोरोनाचा शिरकाव : पुरंदरमध्ये २१ वा मृत्यू तर तालुक्याची संख्या ४८५ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी व मांडकी येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर जेजुरी येथील उपचार घेत असलेल्या १ वृद्धाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पुरंदरच्या प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८५ झाली आहे तर मृत्यु २१ झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एक व जेजुरी येथील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी येथील १ व्यक्ती, पुरुष वय वर्षे ७६ दवाखान्यात २३ जुलै पासून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. ते आज मयत झालेत.
मांडकी येथील सातारा येथे ऍडमिट महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS