सिंगापूर गाव पाच दिवस राहणार बंद : गावाने घेतला निर्णय

Admin
सिंगापूर गाव पाच दिवस राहणार बंद : गावाने घेतला निर्णय

 पुरंदर :  प्रतिनिधी
  
सिंगापूर (ता.पुरंदर) येथे नुकताच एक रुग्ण सापडल्यामुळे गावात तातडीने औषध फवारणी करून घेण्यात आली. तसेच सर्वानुमते कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळावा व रुग्णांची साखळी तुटावी यासाठी गाव बंदीचा एक मुखी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दशरथ लवांडे यांनी दिली.

        यावेळी सरपंच रामदास उरसळ, उपसरपंच स्वाती आबा कोरडे, ग्रामसेविका मीरा होले तसेच सर्व सदस्यांनी हा निर्णय घेऊन तहसीलदार रुपाली सरनोबत यांना कळविला आहे.

     गावात अत्यावश्यक सेवा ही दिवसभर चालू राहील. तर सकाळी नऊ वाजेपर्यंत दूध विक्री चालू ठेवण्यात येणार आहे. गावाचा पूर्ण सर्वे झाला असून बफरझोनमध्ये गाव टाकण्यात आले आहे असे ग्रामसेविका मीरा होले यांनी सांगितले.

        लोकांनी कोरोना रोगाची साखळी तुटावी. यासाठी शासनाला सहकार्य करून बंद पूर्णपणे पाळावा असे आव्हान सरपंच रामदास उरसळ व पोलीस पाटील यादवेंद्र उरसळ यांनी केले.
To Top