नीरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
पुरंदर : प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना आज राज्यात अभिवादन जाते. निरा येथील अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्यावतीने साठे यांना अभिवादन करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुण्य तिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटोळे आणि ज्येष्ठ नागरिक शिवाजी पाटोळे यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील पाटोळे, शिवाजी पाटोळे, नीलेश धुमाळ, सागर पाटोळे, कृष्णा आडगळे, आकाश पाटोळे, कृणल पाटोळे, रमेश वाघमारे, प्रकाश पाटोळे, गणेश पाटोळे, विकास पाटोळे, किरण पाटोळे उपस्थितीत होते. यावेळी बोलताना सुनील पाटोळे म्हणाले की अण्णाभाऊंचं लोकसाहित्यातील योगदान फारमोलाचे आहे. अण्णाभाऊंनी पोवाड्याच्या माध्यमातून शिव छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द लोकांपर्यंत पोचवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांनी निर्माण केलेले साहित्य बहुजन समाजासाठी मार्गदर्शक आहे. अशा या थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण जाणुन घेतले पाहिजे. यांचे विचार समाजातील लोकांसाठी उपयोगी आहेत.
COMMENTS