लोणंद च्या स्वामीसमर्थ हॉस्पिटल कडून कोविडच्या लढाई साठी उपमुख्यमंत्र्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्त

Admin
लोणंद च्या स्वामीसमर्थ हॉस्पिटल कडून कोविडच्या लढाई साठी उपमुख्यमंत्र्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्त

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डॉ मकरंद डोंबळे आणि डॉ उमेश साळुंखे यांनी कोरोना च्या लढाईत मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश व  अल्ट्रा व्हायलेट स्टेरीलायझेन ही मशीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केली. 
           काल बारामती या ठिकाणी धनादेश व मशीन पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी डॉ मकरंद डोंबळे डॉ उमेश साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.  कोरोना महामारीच्या काळात आपल्याकडे येणारा प्रत्येक कागद निर्जंतुक पद्धतीने यावा , या उद्देशाने अल्ट्रा व्हायलेट स्टेरीलायझेन या तत्वावर काम करणारे मशीन पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच स्वामी समर्थ हे हॉस्पिटल दरवर्षी पवार यांचा  वाढदिवस आरोग्यशिबिर, रक्तदानशिबिर अशा विविध उपक्रमाने साजरा करत असतो.
To Top