जेजुरीत नाभिक व्यावसायिकांना सलून सुरक्षा किटचे वाटप
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक असलेले सुरक्षा किटची नाभिक समाजाती कारिगरांना आवश्यक्ता आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी शहरातील नाभिक समाजाचे सलून व्यवसायिक व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जेजुरी देवसंस्थांनचे माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे व मित्र परिवाराच्या वतीने सलून सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
गेली तीन महिने लॉकडाऊनच्या काळात राज्यासह जेजुरीतील सलून व्यवसाय बंद होते . २७ जून रोजी सलून व्यवसाय सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. संपूर्ण सुरक्षा साधने, काटेकोर नियम पाळुन हे व्यवसाय सुरु करण्याच्या सक्त सूचना शासनाने दिल्या आहेत. नाभिक समाजाचे सलून व्यवसायिक व ग्राहकांची सुरक्षा राखली जावी या हेतूने डॉ.प्रसाद खंडागळे यांच्या पुढाकारातून पीपीई किट्स, मास्क, फेसशिल्ड, ग्लोज, सेनेटायझर आदी वस्तुंचे ३० हजार रुपये किमतीचे सुरक्षा किट जेजुरीत वाटप करण्यात आले. डॉ.प्रसाद खंडागळे यांच्या पुढाकारातून साईबाबा संस्थान शिरगाव, लायन्स क्लब, हेंकल लॉकटाईट कंपनी यांच्या माध्यमातून वाघ्या मुरळी, लोककलावंत यांना जीवांवश्यक वस्तू, सरकारी हॉस्पिटल मध्ये पीपीई किट्स, तसेच गेली दहा वर्षात तालुक्यातील अनेक शाळांना शौचालय, सौरदिवे, विज्ञान साहित्य ई लर्निंग आदी कोट्यवधी रुपयांचे साहित्य वाटप केले आहे .
जेजुरी येथे सलून सुरक्षा वाटप प्रसंगी डॉ.प्रसाद खंडागळे, देवसंस्थांनचे माजी विश्वस्त नितीन राऊत, नाभिक समाजाचे पदाधिकारी सुशील राऊत, मल्हार राऊत,जेजुरी शहर अध्यक्ष विजयबापू राऊत,अशोक गायकवाड, प्रसाद क्षीरसागर ,सनी राऊत,सतीश सांगळे, ओंकार जाधव, महेश गायकवाड, सचिन राऊत, मयूर पांडे आदी उपस्थित होते.
COMMENTS