पुरंदरचे मोठे गाव असलेल्या वाघापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. आज सकाळी सासवडमध्ये ७ रुग्ण व ग्रामीण भागांमध्ये ४ रुग्ण वाढले होते तर संध्याकाळी वाघापूर येथील १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुरंदर मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११३ झाली आहे.
वाघापूर येथील व्यक्ती सिरम कंपनी मध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
मागील काळात कोरोनाचे पहिले रुग्ण ही हडपसर येथील नामांकित औषध कंपनी असलेल्या सिरम मधील आढळून आले होते. हे रुग्ण सासवड-पुरंदरच्या ग्रामीण भागातून कंपनीच्या बसमधून प्रवास करत असतात. त्यामुळे त्यावेळी रुग्णांची संख्या वाढणार अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी तितकासा संसर्ग वाटला नाही. त्याच धर्तीवर आत्ताच्या वाघापूरच्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर यांचा संसर्ग होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
COMMENTS