धक्कादायक .....पुरंदर मधील कोरोनाचा चौथा बळी
पुरंदर : प्रतिनिधी
धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुरंदर तालुक्यातील कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. धनकवडी येथील एका व्यक्तीचा शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शस्त्रक्रियेपूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याने आता पुरंदर मध्ये अजून एक कोरोनाचा बळी गेल्याचे समोर येत आहे.
धनकवडी येथील मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने गाठ झाली असल्याने शस्त्रक्रिया करण्याकरिता रुग्णालयात भरती झालेल्या व्यक्तीचा. शस्त्रक्रिये पूर्वीच्या तपासणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशी माहिती तहसीलदार सरनोबत रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS