सोमेश्वर विद्यालय झालं ऑनलाइन : १० वीचे वर्ग सुरू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
खाजगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण चालू केलं असतानाच आता माध्यमिक विद्यालये देखील यामध्ये मागे राहिली नाहीत, बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालायने आज पासून दहावीच्या विदयार्थीचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आता माध्यमिक शाळांनी देखील खाजगी शाळांचे अनुकरण करत ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे.
दहावीच्या मुलांच्या पालकांच्या मागणीनुसार सोमेश्वर विद्यालयाने आज पासून १० चे ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. शिक्षक युवराज शिंदे, आर व्ही नलवडे, व्ही एल पाटोळे, वाय एस महाले, एस के कदम, व्ही आर रासकर, डी एस दगडे, प्रतिभा कुलकर्णी, एस के तितकारे, हे शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेत आहेत. ४० मिनिटांचा एका विषयाचा तास असून रोज चार विषयाचे तास घेतले जातात,
एस. पी. जगताप- प्राचार्य सोमेश्वर विद्यालय
रोज चार विषयांचे तास घेतले जात असून यात महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. १० प्रमाणेच इतर वर्गाचे देखील ऑनलाइन शिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे
COMMENTS