मोरगावच्या मयुरेश्वरमध्ये मुलींची बाजी

Admin
मोरगावच्या मयुरेश्वरमध्ये मुलींची बाजी

मोरगांव : प्रतिनिधी

बारावीचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये श्री  मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोरगांव ता.  बारामती येथे कला शाखेच्या मुलींनी बाजी मारली आहे . माध्यमिक विद्यालयाचा  कला शाखेचा ८० तर विज्ञान  शाखेच्या ९७.११  टक्के निकाल लागला.
        ईयत्ता  बारावीचा निकाल आज दुपारी  ऑनलाईन पद्धतीने  घोषित करण्यात आला . बारामती तालुक्यातील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  कला शाखेच्या ५०  विद्यार्थ्यांनी  तर विज्ञान  शाखेतील ४८  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी कला शाखेचा ८०  तर विज्ञान शाखेचा  ९७. ११  टक्के निकाल झाला. यामध्ये कला शाखेतील  कु . हेमा सुरेश पवार  हिला  ७४ . ६१ टक्के मिळवून प्रथम क्रमांक  , कु.शीतल सायबू गोलांडे ६६  टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर श्रुती राजेंद्र जाधव हिने  ६४ . ६१  टक्के मिळाल्याने तृतीय क्रमांक पटकविला . कला शाखेतील तिनही क्रमांक मुलींचे आले असल्याने  मुलींनी बाजी मारली .
          विज्ञान शाखेतील  ओंकार प्रकाश बोरकर यांस ६६  . ७७ टक्के मिळाल्याने प्रथम क्रमांक ,  मयूर भाऊसो ठोंबरे यांस ६४ . ४६ टक्के मिळवून द्वितीय  तर  कु. शमीका सुर्यकांत तावरे व कु . दिशा संदिप दुबळे  यांनी प्रत्येकी  ६४  टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे . सर्व उतीर्ण विद्यार्थांचे  प्राचार्य   पांढरे डी .एन . पर्यवेक्षक  भालचंद्र बिराजदार  यांनी अभीनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . 
To Top