सोमेश्वरनगर परिसरात चार शाळांचा बारावीचा निकाल शंभर टक्के
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परिक्षेत सोमेश्वरनगर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विज्ञान महाविद्यालयाचे निकाल १०० टक्के लागले असून मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुगटराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी, विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई शाळेचाही निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची गौडदौड कायम राखली आहे.
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर विद्यालयाचे यावर्षी पहिल्या बॅचचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. प्रथम येण्याचा मान नेहमीप्रमाणेच मुलींनी पटकावला आहे. वैष्णवी सुरेश आहेरकर हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम, श्रुती पांडुरंग बोबडे हिने ९१.६० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि सोहन सुनिल खोमणे याने ९०.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरचा निकाल शंभर टक्के लागला असून याठिकाणी मुलींनीच बाजी मारली आहे. श्रद्धा नंदकुमार जाधव हिने ९० टक्के गुण मिळवत प्रथम, योगिता धनंजय चौगुले हिने ७९ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि ऐश्वर्या संजय भोसले हिने ७३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सर्व संचालकमंडळ आणि विद्यालयाचे प्राचार्य एस.पी. जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडीच्या विज्ञान शाखेत स्वप्नील आटोळे याने ८३ टक्के गुण पटकावत प्रथम, मुस्कान मोकाशी ७७ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि कोमल हाके हिने ७० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर कला शाखेत सोनी कचरे हिने ८० टक्के प्रथम, विशाल ठोंबरे ७८ टक्के द्वितीय आणि ज्योती गाढवे ७६ टक्के तृतीय क्रमांक. संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी या विद्यालयाचा व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८४ टक्के लागला आहे.
मुगटराव काकडे महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा ९९ टक्के, कला शाखेचा ६७ आणि व्यावसायिक अभ्यासक्रमचा निकाल ८३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत ओंकार पिंगळे याने ७९.८४ टक्के गुण मिळवून प्रथम, वृषाली गडदरे हिने ७९.५३ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि ओंकार थोपटे याने ७९.२३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश काकडे आणि प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS