बारामती मध्ये अजून तीन रुग्णांची भर : तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Admin
बारामती मध्ये अजून तीन रुग्णांची भर : तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

आज सकाळी ६९ पैकी ५९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. उर्वरित १० अहवाल राखून ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          कालचे उर्वरित दहा स्वॅब नमुने अहवाल प्राप्त झाले असून त्यामधील तीन जण बारामती मधील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व आज एकूण ४६ स्वॅब  नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी २८ निगेटिव्ह आले असून १८ नमुने यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे तो संध्याकाळी किंवा रात्री अपेक्षित आहे.               आज पॉझिटिव्ह आलेल्या तीन पैकी एक २४ वर्षे वयाचा तरूण सूर्यनगरी येथील रहिवासी असून देसाई इस्टेट येथील १८ वर्षीय तरुण व जिल्हा नांदेड येथील एक ३३ वर्षे वयाचा ड्रायव्हर जो दोन दिवसापूर्वी बारामतीला आला होता असे तीन जण बारामतीमध्ये आज पॉझिटिव आलेले आहेत
To Top