पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या @ ३००
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी या मोठ्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच, आता ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. आज दि. १६ रोजी सासवड सह ग्रामीण भागातील २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल २९६ झाली आहे.
सासवड येथून पाठविण्यात आलेल्या ९२ स्वॅप पैकी २० चे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २ खाजगी अहवाल पॉझिटिव्ह आहेत. असे एकूण २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल आहेत. १० सासवड येथील - ८ हाय रिस्क, २ नवीन
१२ ग्रामीण - परीचे ५, माळशिरस ५, कुंभरवळण १, भिवडी १ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.