पुरंदरमध्ये कोरोनाचा १२ वा बळी : २७४ पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरीच्या पाठोपाठ आता ग्रामीण भागात ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व मृत्यूची संख्या वाढत आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर सोनोरी येथील १ वृद्ध व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाला आहे. आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २७४ तर १२ मृत्यू झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील काल मृत्यू झालेल्या रुग्णाचा वय वर्षे ७०, पुरुष, खाजगी लॅब मध्ये केलेला कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS