दिलासादायक.... बारामतीत एकूण ६९ पैकी ५९ अहवाल निगेटीव्ह, १० अहवाल प्रतीक्षेत
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल बारामती तालुक्यातील ६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली यापैकी ५९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १० जणांचे अहवाल प्रतीक्षेत ठेवण्यात आले असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ५९ व संध्याकाळी १० असे ६९ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी एकूण ५९ स्वॅब नमुने निगेटिव्ह आलेले आहेत व दहा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
COMMENTS