पुरंदरमध्ये कोरोनाचे २७४ पॉझिटिव्ह रुग्ण तर ११ मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड पाठोपाठ आता जेजुरीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर जेजुरी येथील १ वृद्ध व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाला आहे. आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २७४ तर ११ मृत्यू झाले आहेत.
जेजुरी येथील पुण्यात ऍडमिट असलेल्या रुग्णाचा वय वर्षे ६५, पुरुषाचा मृत्यू झाला आहे. जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या १३ स्वॅप पैकी १ जेजुरी येथील हाय रिस्क पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट मधील आहे. इतर सर्व निगेटिव्ह आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS